जिवा लागे हुरहूर
मल्हार नादे दूरदूर
छेडे तार आत उर
आठवांचा डोळा पूर
विरहाचा मनी सूर
नको खुरटू अंकुर
भावनांना नको चीर
बोल सख्या रे मोकळे
आभाळ किती दाटले
घन दूर दूर थिजले
ना कश्याने होरपळले
बरस बरस रे घना
प्रीतीत मज नाहू दे ना
गारव्यात झुलव ना
गंधात पुन्हा भिजव ना ........
तेजश्री
३०.०८.२०१२
